ट्रम्प हे बेशिस्त अध्यक्ष : रेक्‍स तिलेरसन

त्यांच्या माजी सहकाऱ्यानेच केली टीका

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी विदेश मंत्री रेक्‍स तिलेरसन यांनी डोनाल्ड ट्रम्प हे बेशिस्त अध्यक्ष असल्याची टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या टिकेला उत्तर देताना ट्रम्प यांनीही त्यांच्यावर जाहीर पलटवार केला असून तिलेरसन हे ठार मुके सहकारी होते असे म्हटले आहे. गेल्या मार्च महिन्यातच ट्रम्प यांनी तिलेरसन यांना आपल्या कॅबिनेटमधून डच्चु दिला होता. गुरूवारी रात्री एका मेजवानीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्यावर ते बेशिस्त असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलतानाहीं त्यांनी हाच आरोप केला.

ते म्हणाले की अध्यक्ष ट्रम्प बऱ्याच वेळा कायदे तोडून निर्णय घेत असत. त्यावेळी मी त्यांना असे करणे कायदे संमत होणार नाही असे बऱ्याचवेळा निदर्शनाला आणून देत असे त्यावेळी ते माझ्यावर संतप्त होत असत. त्यांची कार्यपद्धती ही अशीच होती व हे कायदे संमत नाही असे त्यांना जवळपास रोजच सांगण्याची वेळ येत असे. त्यामुळे माझ्याकडून ही उत्तरे ऐकून ते थकले होते. त्यांचे वर्तन बेशिस्त असे अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. तिलेरसन यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर ट्रम्प चांगलेच संतापले आणि त्यांनी ट्‌विटरवरून तिलेरसन यांची जोरदर कानउघडणी केली. अमेरिकेच्या प्रशासनात उच्च स्थानावर काम करण्याची त्यांची बौद्धिक क्षमता नव्हती अशी शेरेबाजीही ट्रम्प यांनी त्यांच्याबाबत केली आहे. ते आळशी होते. ते मुके होते अशी मुक्ताफळेही ट्रम्प यांनी तिलेरसन यांच्यावर लावली आहेत.

कंसास शहरातून वॉशिंग्टनला परत येत असताना विमानतच त्यांनी तिलेरसन यांच्यावर ही मुक्ताफळे उधळली आहेत. तिलेरसन यांच्या जागी आणलेले माईक पॉम्पेओ हे अधिक चांगले काम करीत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. तिलेरसन आणि ट्रम्प यांची आधी ओळखही नव्हती. ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना प्रशासनात स्थीर बुद्धीचे सहकारी असावेत या भावनेने त्यांच्या नावाची शिफारस रिपब्लीकन पक्षाच्या कोअर ग्रुप मधील कोणीतरी केली होती त्यामुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तिलेरसन यांना सरकारी कामाचा पुर्वीचा कोणताही अनुभव नव्हता. ते एका तेल कंपनीत उच्चपदस्थ होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)