अमेरिकेत आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

मेक्‍सिको सीमा भिंतीसाठी बसलेत अडून

वॉशिंग्टन: अमेरिका आणि मेक्‍सिको यांच्या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तेथे सीमा भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर अडून बसलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आणिबाणी लागू करण्याची धमकी विरोधकांना दिली आहे. अशी आणिबाणी जाहीर केली की अमेरिकेच्या कॉंग्रेसला टाळून सीमा भिंतीसाठी सरकारी खर्चाच्या पैशाला मंजुरी देणे त्यांना शक्‍य होणार आहे.

या भिंतीसाठी सरकारी खर्चाला अनुमती देण्यास विरोधकांनी नकार दिला आहे. पण ट्रम्प त्यासाठी अडून बसल्याने अमेरिकेत सध्याच शटडाऊनचा पेच प्रसंग उद्‌भवला आहे. या पेच प्रसंगावर तोडगा निघणे अजून दृष्टीपथात आलेले नाही त्यामुळे त्यावर नामी उपाय म्हणून अध्यक्ष ट्रम्प आता अमेरिकेत आणिबाणीच घोषित करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांनी स्वत:च तसे संकेत दिले आहे. मेक्‍सिको सीमेवरून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते व त्याठिकाणाहून मादक द्रव्यांची तस्करी होते असे त्यांचे म्हणणे आहे. हे रोखायचे असेल तर त्या सीमा भागात भिंत बांधणे गरजेचे आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी 5.6 अब्ज डॉलर्सच्या खर्चाला संसदेत अनुमती मिळावी असा त्यांचा प्रस्ताव आहे. पण विरोधकांनी त्यांचा हा प्रस्ताव रोखून धरला आहे.

स्वत: ट्रम्प यांनी गुरूवारी सीमा भागाचा दौरा केला त्यावेळी त्यांनी हे संकेत दिले. ते म्हणाले की अमेरिकेच्या भवितव्यासाठी 5.6 अब्ज डॉलर्स ही काही फार मोठी रक्कम नाही. या भिंतीमुळे आपण दरवर्षी देशाचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो. ट्रम्प यांनी आणिबाणी आणण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली असल्याचे वृत्त असून त्यांनी आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही त्यासंबंधात एक बैठक बोलावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)