शटडाऊन संपवण्यासाठी ट्रम्प यांची तडजोडीची तयारी

वॉशिंग्टन: अमेरिकेमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेला “शटडाऊन’ संपवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या नेतृत्वाखालील वाटाघाटींना यश आलेले नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांकडून ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षावर नव्याने दबाव आणण्यास सुरुवात केली गेल्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका थोडी सौम्य केली आहे.

मात्र मेक्‍सिकोच्या सीमेवरील भिंतीसाठी 5.6 अब्ज डॉलरच्या मागणीवर त्यांनी कोणतीही तडजोड होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. जर डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांची ईच्छा असेल तर 20 मिनिटात आपण तडजोड करण्यास तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना जर कॉंक्रिटची भिंत आवडत नसेल तर स्टीलची भिंत बांधण्याची आपली तयारी आहे, असे ट्रम्प म्हणाले. पण भिंत बांधली जाणार याबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र अशाप्रकारे सीमेवर भिंत उभारणे अनैतिक आणि परिणामशून्य उपाययोजना असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)