ट्रम्प यांना सिनेटचा प्रथमच दणका-निर्णयाविरुद्ध ठराव मंजूर

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना सिनेटने मोठा दणका दिला आहे. त्यांच्या एका निर्णयाविरुद्धचा ठराव सिनेटने मंजूर केला आहे. 100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात 70 तर बाजूने 26 मते पडली आहेत.

100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये डोनॉल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे 53 सदस्य आहेत. यावरून रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर्सनीही ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात मत नोंदवल्याचे दिसून येते. रिपब्लिकन नेते मिच मॅककॉनेल यांनी हा प्रस्ताव मांडला होता. अल कायदा, इसिस आणि त्यांच्याशी संबधित दहशतवादी गट धोक्‍याचे असल्याच्या तथ्याचा विचार करण्यात येणर असल्याचे त्यांनी सांगितले होते. सीरियामधून आणि अफगाणिस्तानातून अमेरिकन लष्कर मागे घेण्याच्या निर्णयाला डेमॉक्रेटस आणि रिपब्लिकन सिनेटर्सचाही विरोध आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार सीरिया आणि अफगाणिस्तान यापैकी कोणत्याही देशातून लष्कर काढून घेतल्यास आजवर मिळवलेले यश फुकट जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. या ठरावाचा दक्षिण-पश्‍चिम एशियासंबधी एका व्यापक सुरक्षा कायद्यात समावेश करण्यात येणार आहे. सीरियामधून अमेरिकन लष्कर मागे घेण्यात येण्याबाबतत ट्रम्प यांनी डिसेंबर महिन्यात्‌ ट्विट केले होते. इसिसचा पूर्ण पाडाव झाला असल्याचे कारण त्यांनी दिले होते. मात्र हा दहश्‍तवादी गट अजूनही गंभीर धोका असून तो हातपाय पसरत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने गेल्या आठवड्यातच दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)