कोल्हापूर – कोल्हापूरच्या पेठ वडगाव ते हातकणंगले महामार्गावर हातकणंगले गावाजवळ सिमेंटचा ट्रक आणि ट्रॅक्स मध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोन वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. हे सर्वजण कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील साळवी या गावातील असून एकाच कुटुंबातील आहेत.
हे सर्वजण नवविवाहीत जोडप्याला जोतीबाच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी हातकणंगले गावाजवळ सिमेंटचा ट्रक आणि ट्रॅक्स मध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना कोल्हापूर रातील सीपीआर रुगणालायत उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.