“ट्रॉपिकल’ ट्रम्प बोलसोनारो ब्राझीलचे नवे अध्यक्ष 

ब्राझीलिया – ट्रॉपिकल ट्रम्प नावाने ओळखले जाणारे बोलसोनारो हे ब्राझीलचे नवे अध्यक्ष बनले आहेत. लष्करातील ,माजी कॅप्टन असलेल्या बोलसोनारो यांनी आपले प्रतिस्पर्धी फर्नांडो हद्दात यांच्यावर विजय मिळवला. बोलसोनारो यांना 55.13 टक्के, तर फर्नांडो हद्दात यांना 44.87 टक्के मते मिळाली आहेत. बोलसोनारो यांच्या विजयाने आणखी एका देशाची सत्ता कट्टरपंथीयांच्या हाती गेली आहे.

आपण ब्राझीलचे नशीब बदलून टाकू असे त्यांनी विजयानंतरच्या आपल्या फेसबुकवरील भाषणात म्हटले आहे. गेल्या महिन्यात एका रॅलीच्या वेळी एका हल्लेखोराने त्यांच्या पोटात सुरा खुपसला होता, तेव्हापासून आपल्या प्रचारासाठी ते फेसबुकचा वापर करत आहेत. ब्राझीलचे पूर्व लष्करी व्यवस्थेतील छळाचे पूर्ण समर्थन, महिला द्वेष, वंशवाद आणि समलैंगिकतेबाबत पूर्वग्रहदूषित निवेदने यांमुळे जनतेच्या टीकेचे धनी असूनही भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था याबद्दल जनतेच्या मनात असलेल्या संतापामुळे बोलसोनारो यांचा विजय झाला आहे. 1 जानेवारी 2019 रोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)