विश्वचषकाचे सामने रद्द झाल्याने नेटकऱ्यांनी आयसीसीला केले ट्रोल 

नवी दिल्ली – भारत आणि न्युझीलंड दरम्यान होत असलेल्या विश्‍वचषकातील अठराव्या सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा झाली आहे. विश्वचषकात आतापर्यंत एकूण चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यामुळे चाहत्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर दर्शवली असून #shameonICC  म्हणून हॅशटॅग ट्रेंड होत आहे. नेटकऱ्यांनी पावसाला आयसीसीच्या पॉईंट टेबलवर पहिले स्थान दिले आहे.

 

दरम्यान, याआधीही दक्षिण आफ्रिका-वेस्टइंडीज, श्रीलंका-पाकिस्तान आणि श्रीलंका-बांग्लादेश यामधील सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. विश्वचषकाच्या ४४ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे चार सामने रद्द झाल्याची घटना घडली आहे. यामुळे आयसीसीच्या शेड्यूलिंग कमेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एवढेच नव्हे तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना लवकरच रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)