ट्रम्पयांचा पुन्हा भारतावर हल्लाबोल

वॉशिंग्टन- अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या करांवरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्लाबोल केला आहे. दोन आठवडयांपूर्वी जी 20 परिषदेच्याआधी त्यांनी भारताविरोधात ज्या पद्धतीचे ट्‌विट केले होते तसेच ट्‌विट त्यांनी आताही केले आहे. भारताकडून अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणारा कर अमेरिकेला मान्य नाही अशा आशयाचे ट्‌विट ट्रम्प यांनी केले आहे. व्यापारावरुन अमेरिकेचे भारताबरोबरच अन्य देशांबरोबरही वाद आहेत.

अनेक वर्षांपासून अमेरिकन उत्पादनांवर भारतात मोठया प्रमाणावर कर आकारला जात आहे. आता पुन्हा कर वाढवला. हे अजिबात मान्य नाही. करवाढ मागे घेतली पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर होणाऱ्या भेटीच्यावेळी हे मुद्दे उपस्थित करेन असे त्यांनी जी 20 परिषदेपूर्वी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले होते. ट्रम्प प्रशासनाने व्यापारातील भारताचा प्राधान्य क्रमाचा दर्जा काढून घेतल्यानंतर मोदी सरकारनेही 28 अमेरिकी उत्पादनांवर कर वाढवला. भारत-अमेरिका संबंध बळकट असले तरी व्यापाराच्या मुद्दावरुन दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)