#व्हिडीओ : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसमोर त्रिपुराच्या मंत्र्याने महिला मंत्र्याच्या कमरेवर ठेवला हात

नवी दिल्ली – त्रिपुराच्या एका मंत्र्याने सार्वजनिक मंचावर चुकीच्या पद्धतीने हात लावला. यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बिप्लव देवही उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी आक्षेप घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजप नेता आणि त्रिपुराच्या बिप्लव देव यांच्या मंत्रिमंडळातील नेते मनोज कांती देव यांनी सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्री संताना चकमा यांच्या कमरेवर चुकीच्या पद्धतीने हात ठेवला. यानंतर संताना चकमा यांनी लगेच मनोज कांती देव यांचा हात दूर केला.

दरम्यान  पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री मंचावर असताना मनोज कांती देव यांनी महिला मंत्र्याबरोबर केलेले वर्तन अत्यंत चुकीचे आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)