तिहेरी तलाक विधेयक लांबणीवर

हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता

नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज वादग्रस्त तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सादर होणार होते. मात्र राज्यसभेत विरोधंकाच्या गोंधळामुळे आणि या विधयेकावर सर्वसंमती न झाल्यामुळे  पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

त्यामुळे हे विधयेक आता हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नसले तरी मोदी सरकारकडे यासाठी अध्यादेश आणण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

तिहेरी तलाक हे विधेयक पास करण्यासाठी पावसाळी अधिवेशनाचे सत्र एक दिवसाने वाढेल अशीही शक्यता व्यक्त केली जात होती.

विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. जेव्हा हे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा राज्यसभेत या विधयेकावर सर्वाची संमती न झाल्याने हे विधेयक आज सभागृहासमोर मांडता येणार नसल्याचे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. मात्र सध्यातरी पावसाळी अधिवेशन समाप्त झाल्याने हे विधेयक आता हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)