तिहेरी तलाकबाबतचा अध्यादेश नव्याने लागू

नवी दिल्ली: तिहेरी तलाकवर बंदी आणणारा अध्यादेश सरकारने आज नव्याने लागू केला. तोंडी आणि तात्काळ तलाक देण्याच्या प्रथेला बेकायदेशीर ठरवणारा “मुस्लिम वुमन्स प्रोटेक्‍शन ऑफ राईटस ऑन मॅरेज’ हा अध्यादेश शनिवारी लागू करण्यात आला. या गुन्ह्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशामध्ये करण्यात आली आहे.
या संबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते.

मात्र राज्यसभेमध्ये त्याला मंजूरी मिळू शकलेली नव्हती. संसदेची मंजूरी न मिळू न शकल्यामुळे या अध्यादेशाला नव्याने लागू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात नव्याने अध्यादेश काढण्यास मंजूरी दिली होती.

या संदर्भातील नव्या कायद्याचा दुरुपयोग होण्याच्या भीतीपोटी सरकारने या विधयकामध्ये काही दुरुस्त्याही केल्या होत्या. त्यात आरोपीला जामीन मिळणे आणि तडजोडीनंतर गुन्हा मागे घेण्याच्या तरतूंदींचाही गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच अंतर्भाव करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)