तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

वादळी चर्चेनंतर विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली: मुस्लिम महिलांना तोंडी तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट देण्याच्या अनिष्ट प्रथेला समाप्त करणारे विधेयक आज लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. लोकसभेमध्ये दिवसभर झालेल्या जोरदार चर्चेनंतर संध्याकाळी झालेल्या मतदानामध्ये 245 विरुद्ध 11 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक कोनत्याही एका धर्माविरोधात किंवा समुदायाविरोधात नाही. तर मुस्लिम महिलांच्या न्यायासाठी असल्याच्या मतावर सरकारच्यावतीने जोर देण्यात आला.

एकमुखी मंजूरी का नाही
जानेवारी 2017 पासून तिहेरी तलाक दिल्याची 477 प्रकरणे घडली आहेत. एका प्राध्यापकाने आपल्या पत्नीला व्हॉट्‌स ऍपवरून तलाक दिल्याचेही उदाहरण आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहिली म्हणून एका मुस्लिम व्यक्‍तीने आपल्या पत्नीला तलाक दिला होता, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. जर 12 वर्षांखालील मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेला लोकसभेत एकमुखी मंजूरी मिळू शकते तर या विधेयकाला एकमुखी मंजूरी का मिळू शकत नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज सरकारच्यावतीने लोकसभेमध्ये मांडण्यात आले. मात्र या विधेयकाला सर्वच विरोधी पक्षांकडून सामुहिक विरोध झाला. या विधेयकाच्या मसुद्याची कसून छाननी होणे गरजेचे असल्याने या विधेयकाला संसदेच्या संयुक्‍त प्रवर समितीकडे पाठवण्यात यावे, अशी एकमुखी मागणी विरोधकांनी केली.

मात्र विरोधकांची ही मागणी सरकारने फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकाच्या चर्चेला दिलेले उत्तर संपल्यानंतर लगेचच कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, अद्रमुक आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधकांनी सुचवलेल्या काही सुधारणा चर्चेदरम्यान नाकारण्यात आल्या. आवाजी मतदानाने विधेयक मंजूर होण्यापूर्वी विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केले. त्यानुसार 245 विरोधात 11 मतांनी विधेयक मंजूर झाल्याचे स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)