तिहेरी तलाक बंदी विधेयक मंजूर होऊ देणार नाही : कॉंग्रेस

नवी दिल्ली: तात्काळ आणि तोंडी तिहेरी तलाक देणे कायद्याने गुन्हा ठरवणारे विधेयक उद्या (सोमवारी) राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. हे विधेयक सध्या आहे त्या स्थितीत मंजूर करू दिले जाणार नाही, असे कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे. भाजपने आपल्या सदस्यांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी “व्हिप’ बजावला आहे.

कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद हे राज्यसभेमध्ये विधेयक चर्चेसाठी मांडनार आहेत. लोकसभेमध्ये विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर 245 विरुद्ध 11 मतांनी हे विधेयक गुरुवारीच मंजूर झाले आहे. राज्यसभेत सत्तारुढ “एनडीए’ अल्पमतात आहे. पण तरिही या विधेयकाला पाठिंबा मिळेल असा आत्मविश्‍वास प्रसाद यांनी शुक्रवारीच व्यक्‍त केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र या विधेयकाला सध्याच्या स्वरुपात मंजूर केले जाऊ नये यासाठी कॉंग्रेस अन्य विरोधकांबरोबर असेल, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले. लोकसभेमध्ये या विधेयकाविरोधात अद्रमुकसह सर्व 10 विरोधी पक्षांची एकजूट होती, असेही त्यांनी सांगितले. हे विधेयक संसदेच्या संयुक्‍त प्रवर समितीकडे पाठवून देण्याची विरोधकांची मागणी आहे. सरकारने हे विधेयक एखाद्या समाजाला लक्ष्य करण्यासाठी आणल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)