कमल हसन करणात तृणमूलचा प्रचार 

कोलकाता – दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि नव्यानेच राजकारणामध्ये उतरलेले कमल हासन यांच्या “मक्कल नीधी मैयाम’ या पक्षाने पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आहे. कमल हासन यांनी अलिकडेच कोलकात्यात जाऊन तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि सुमारे तासभर चर्चाही केली होती. त्यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

तृणमूल कॉंग्रेसच्यावतीने अंदमान आणि निकोबार बेटांवर 9 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कमल हासन यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कमल हासन यांच्या पक्षाकडून यंदा लोकसभेची निवडणूक लढवली जाणार नाही. त्यामुळे या निवडणूकीसाठी ते कोणाला तरी पाठिंबा देणार हे उघड होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)