ममतांना हादरा; तृणमुलचा खासदार भाजपत

नवी दिल्ली: तृणमुल कॉंग्रेसचे खासदार सौमित्र खान यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तृणमुल कॉंग्रेसला हादरा बसला आहे. खान हे लोकसभेचे सदस्य आहेत. ते पश्‍चिम बंगाल मधील बिष्णुपुर लोकसभा मतदार संघातून लाकसभेवर निवडून गेले आहेत. या आधी ते पक्षाचे आमदारही होते.

त्यांनी आज बुधवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आपण भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप मध्ये सध्या जोरदार राजकीय स्पर्धा सुरू असताना आमित शहा यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतून तृणमुल पक्षाला हादरा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान या संबंधात प्रतिक्रीया देताना तृणमुल कॉंग्रेसने म्हटले आहे की पक्षाचे भाजप मध्ये गेलेले खासदार सौमित्र खान यांना पक्षाने या आधीच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून काढून टाकले आहे त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या घटनेला फार महत्व नाही. भारतीय जनता पक्षाने मात्र या घटनेला मोठी हवा दिली असून तृणमुल कॉंग्रेसच्या पतनाची ही सुरूवात आहे असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार खान यांच्या संबंधात बोलताना एका तृणमुल नेत्याने सांगितले की खासदार खान हे बरेच दिवस पक्षाच्या संपर्कात नव्हते. ते आपल्या मतदार संघातही नीट काम करीत नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार नाही याची खात्रीही त्यांना पटली होती. आज सकाळीच आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्रही आम्ही त्यांना पाठवले होते त्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा असे ते म्हणाले. त्यांना आता लोकसभा सदस्यपदावरून अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.भाजपचे पश्‍चिम बंगाल मधील ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी सांगितले की तृणमुल मधील अनेक नेत्यांची आता आमच्या पक्षात येण्यासाठी रांग लागेल. ही तृणमुलच्या पतनाची सुरूवात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)