वॉशिंग्टन: येत्या 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला अर्जेन्टिनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यात त्रिपक्षीय बैठक होणार आहे. त्याच दरम्यान तिथे जी 20 परिषद होत आहे, त्या अनुषंगाने ही त्रिपक्षीय बैठक होणार आहे. नियोजनानुसार ही बैठक सुरूवातीला ट्रम्प आणि अबे यांच्यातच होणार होती पण त्यात आता मोदींचाही समावेश करण्यात आला आहे. जी 20 परिषदेला जगातील प्रमुख 20 देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की ट्रम्प आपल्या भेटीत अर्जेन्टिनाचे अध्यक्ष मौरिसिओ माक्री, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे ईन आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप एरडोगन यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. चीनचे अध्यक्ष शी यांच्याशी त्यांचे डिनर सुद्धा आयोजित करण्यात आले असून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनाही ते भेटणार आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा