मुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांचेसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.