महाराष्ट्र सरकारच्या वृक्षलागवड कार्यक्रमामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल: एडगर्ड कागन 

महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची अमेरिकेचे भारतातील वाणिज्यदूत एडगर्ड कागन यांनी प्रशंसा केली आहे. वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम नक्कीच महाराष्ट्रातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व कागन यांच्या भेटीदरम्यान मुनगंटीवार यांनी ‘या’ उपक्रमाबाबत कागन यांना माहिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना कागन यांनी आपल्याला देखील अशा स्तुत्य उपक्रमाचा भाग होयला आवडेल अशी प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)