अकोले -अकोले तालुक्‍यातील इच्छुक शेतकरी, विद्यार्थी, पालक, शिक्षक संस्था चालक आणि नागरिकांना उद्या (दि. 4) सकाळी दहा वाजता राजूर येथील ऍड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात दहा हजार चंदन रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

पुणे येथील हरितमित्र परिवार संस्थेचे अध्यक्ष. डॉ. महेंद्र घागरे हे चंदन वृक्षांची लागवड व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हवामानातील बदल, अतिवृष्टी, दुष्काळ या सारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी चंदनशेती शेतकऱ्याला उत्पन्न मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे. चंदन लागवडीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

त्याचबरोबर पर्यावरण रक्षणालाही मदत होणार आहे. डॉ. घागरे यांनी लाखो चंदन रोपांचे वाटप केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक शासकीय व खासगी पुरस्कार मिळाले आहेत. चंदनाचे महत्व, किंमत आणि चंदन लागवड याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)