मानवाधिकार संघटनांना केंद्र सरकारकडून गुन्हेगारांसारखी वागणूक ! 

ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप 

बंगळुरू – भारतातील मानवाधिकार संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहे अशी खरमरीत टीका ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेने भारत सरकारवर केली आहे. या संस्थेचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी एका निवेदनाद्वारे सरकारवर ही टीका केली आहे. या स्वयंसेवी संस्थांवर सक्तवसुली विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत छापे घातले जात आहेत. या संस्थांना मिळणाऱ्या विदेशी निधीवरही त्यांनी निर्बंध आणले असून त्यांची अनेक बाबतीत गळचेपी केली जात असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत सरकारने इडी मार्फत ऍमनेस्टीच्या कार्यालयांवर छापे टाकून या संस्थेलाही नोटीसा जारी केल्या आहेत. या संस्थेवरील कारवाईच्या अनुषंगाने जे अधिकारी आमच्याकडे आले होते त्यांच्या प्रश्‍नाचा रोख मुख्यत्वे ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि आणि ऍमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाऊंडेशन यांच्यातील संबंधांच्या अुनषंगानेच होते. त्यांनी आमच्याकडे जी कागदपत्रे मागितली ती आम्ही आमच्या अहवालानुसार सरकारकडे या आधीच सादर केली आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)