विमानात धुमश्‍चक्री : नेदरर्लॅंडने पाठवली दोन लढाऊ विमाने 

न्यूयॉर्क: विमानात धुमश्‍चक्री चालल्याचे वृत्त समजल्यानंतर नेदरर्लॅंडने संभाव्य धोक्‍याचा विचार करून दोन लढाऊ विमाने (एफ16) तातडीने पाठवून दिली. मात्र अखेरीस हे सारे प्रकरण काही प्रवाशांमधील झगड्याचे असल्याचे निष्पन्न झाले. विमानातील कर्मचाऱ्यांनी ते नियंत्रणात आणण्यास यश मिळवले. अबूधाबीहून ऍमस्टरडॅमला निघालेल्या विमानात हा प्रकार घडला, मात्र विमान कंपनीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सीटवर जाण्याची सूचना देताच एका अमेरिकन प्रवाशाचे पित्त खवळले. बघता बघता मामला बिघडला आणि विमानात धुमश्‍चक्री सुरू झाली. यात काही प्रवाशांना दुखापती झाल्या आणि मार लागल्याने दोन प्रवाशांचे डोळे काळेनिळे झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर विमान ताबडतोब शिफॉल विमानतळावर उतरवण्यात आले. विमान उतरताच त्या अमेरिकन प्रवाशाला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात तो मनोरुग्ण असल्याचे आढळताच त्याला मानसिक उपचारासाठी मनोचिकित्सालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)