विमानात लपून प्रवास करणे जिवावर बेतले; 3500 फुटावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू

file photo

लंडन – केनिया एअरवेजच्या विमानाने लपून प्रवास करणे एका व्यक्तिच्या जिवावर बेतले असून 3500 फूट उंचावरून उडणाऱ्या विमानातून थेट एका घराजवळच्या बगीच्यात जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती केनिया एअरवेजच्या लॅंडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करत होती. बऱ्याचदा निर्वासित अशा प्रकारे लपून एखाद्या देशात जाण्याचा प्रवास करतात. अनेकदा तो त्यांच्या जीवावरही बेततो.

केनिया एअरवेजचे 787 विमान हिथ्रो एअरपोर्टवर लॅंडिंग करण्यासाठी खाली येत होते. त्याचदरम्यान ती व्यक्ती विमानातून थेट खाली कोसळली. विमानाचे लॅंडिंग झाल्यानंतर गिअर कम्पार्टमेंटमध्ये एक बॅग आणि खाण्यापिण्याचे काही सामान सापडल्याने या घटनेची माहिती सर्वांना मिळाली आहे. त्यावेळी बगीचाचा मालकही तिथेच होता. तीन फूट दुरून त्याने त्या व्यक्तीला पडताना पाहिले आणि त्याला मोठा धक्का बसला. तो मृतदेह माझ्यावर कोसळला नाही, त्यासाठी मी नशीबवान असल्याचेही त्या बगीचाच्या मालकाने वृत्तसंस्थेला सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ती व्यक्ती एवढ्या जोरात कोसळली की लॉनमध्ये एक खड्डा झाला. असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. तर, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी घराच्या आत झोपलो होतो आणि जेव्हा जोरात आवाज आला तेव्हा डोळे उघडले. तेव्हा मी बाहेर येऊन पाहिले तर एका मीटरच्या अंतरावर मृतदेह पडला होता आणि तो छिन्नविछिन्न अवस्थेत होता. ते दृश्‍य पाहून माझा थरकाप उडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)