हेच का ते काँग्रेस ज्यात सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांसारख्या दिग्गजांनी काम केले? : पंतप्रधानांचा प्रश्न

अखनूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू काश्मिरातील अखनूर येथे एका जाहीर सभेसाठी दाखल झाले असून यावेळी उपस्थिताना संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, “देशातील जनता ही दहशतवादाविरोधात एकच भाषा बोलत असून केवळ काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते दहशतवादाला खतपाणी घालणारी भाषा बोलत असून त्यांची भाषा ही पाकिस्तान्यांशी मिळती जुळती आहे.”

काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “सध्याच्या काँग्रेसकडे पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो की ही तीच काँग्रेस आहे का ज्यामध्ये सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान स्वातंत्र्यसेनानींनी काम केले आहे? सत्तेसाठी काँग्रेसचा स्तर दिवसेंदिवस खाली पडत असल्याचं दिसत आहे.”

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरातील दहशतवादाच्या समस्येबाबत बोलताना, “खोऱ्यातील परिस्थिती ही काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी राजकीय स्वार्थासाठी घेतलेल्या निर्णयांचे फलित आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार हे देखील त्यांचीच देण असून त्यांच्यासाठी सत्ता ही देशहितापेक्षाही महत्वाची आहे.” असे आरोप लावले.

पंतप्रधानांनी यावेळी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधताना, “नामदारांचे गुरु टीव्हीसमोर पाकिस्तानला आणि त्यांच्या दहशतवाद्यांना क्लीन चीट देत फिरत आहेत, जर नामदारांचे गुरूच असे असतील तर चेला कसा असेल?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)