‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ माहितीपटाला कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक

7 व्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच किफ 2019 मध्ये अमोल कचरे दिग्दर्शित ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या माहितीपटाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते माहितीपटाचे दिग्दर्शक अमोल कचरे यांनी पारितोषिक स्वीकारले.
महोत्सवात शॉर्ट फिल्म नॉन फिक्शन या विभागात ‘ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी’ या महितीपटाची निवड झाली होती. हा माहितीपट नाशिक येथील सुप्रिया आगाशे यांच्या कामावर बेतलेला आहे. सुप्रिया आगाशे या पर्यावरण संवर्धनासाठी गेली 15 वर्षांहून जास्त काळ सातत्याने काम करत आहेत.

ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी या माहितीपटाचे स्क्रिप्ट अमोल कचरे व श्रद्धा कोळेकर यांनी लिहिले असून सतिश शेंगाळे यांनी छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी पेलली आहे. ऋषिकेश कदम यांनी सबटायटल्स केली आहेत. याआधी पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी या महितीपटाची निवड झाली होती.

माहितीपटाचे नाव : ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी
निर्माता : अमोल कचरे आणि सतीश शेंगाळे
दिग्दर्शक : अमोल कचरे
स्क्रिप्ट : श्रद्धा कोळेकर-कचरे आणि अमोल कचरे
छायाचित्रण आणि संकलन : सतीश शेंगाळे.
सबटायटल्स : ऋषीकेश कदम

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)