प्रेरणा: ओडिशातले परिवर्तन   

दत्तात्रय आंबुलकर 
ओडिशाच्या दुर्गम जंगली व वनवासी भागात साबरमती यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेतून व आपल्या “संभव’ या सेवाभावी व ग्रामोपयोगी संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीच्या व सामूहिक शेतीच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवन आणले आहे.
या प्रयोगाची सुरुवात झाली 1988 मध्ये. त्यावेळी स्वतः पर्यावरणप्रेमी असणारे राधामोहन यांनी आपली मुलगी साबरमती व काही समविचारी मित्र-सहकाऱ्यांच्या सहाय्याने या कामी पुढाकार घेतला. पर्यावरणपूरक व सेंद्रिय पद्धतीच्या शेतीची सुरुवात करण्यासाठी त्यांनी ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पाण्याची मुबलकता असणाऱ्या भागाची निवड केली. आपल्या या प्रयोगात त्यांनी स्थानिकांना सहभागी केले. स्थानिक वनवासी-ग्रामीणांनी तुम्हा शहरी लोकांना शेतीतील काय समजते? इथपासून तुमच्यासारख्या बाहेरच्या मंडळींवर विश्‍वास तो कसा ठेवावा? यासारखे प्रश्‍न उपस्थित केले.
मात्र राधामोहन आणि त्यांची कन्या साबरमती या उभयतांनी मोठ्या धीराने आपले काम सुरू केले व तेवढ्याच सातत्याने ते सुरू पण ठेवले. सुरुवातीला अशक्‍यप्राय वाटणाऱ्या या कामाला यशस्वी करण्याच्या जिद्दीने सुरू केलेल्या सामूहिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला त्यांनी “संभव’ असे सार्थ नाव दिले व आपल्या अथक प्रयत्नांनी हे नाव सिद्ध करून दाखविले. वर्ष 1988 मध्ये “संभव’ची सुरुवात केवळ 1 एकर जागेवरील सिंचनावर आधारित सेंद्रीय शेतीवर झाली. आज “संभव’चे सेंद्रीय शेती क्षेत्र सुमारे 90 एकर जमिनीवर विस्तारले असून त्यामध्ये सुमारे 1000 प्रकारचे वृक्ष व भाताच्या 493 पद्धतीच्या वाणाची शेती करण्यात येते. सेंद्रीय पद्धतीने सुरू असणाऱ्या या शेतीसाठी परिसरातील चार मोठ्या व मध्यम जलसिंचन योजनेची मोठीच मदत होते. आज साबरमती स्वतःला मात्र “संभव’च्या सेविका असेच म्हणवून घेतात.
“संभव’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीसाठी अगदी सुरुवातीपासून आग्रही असणाऱ्या या प्रयत्नांमागे उपलब्ध जमीन आणि पाण्याचा वनशेती व सेंद्रीय शेतीचा प्रचार-प्रसार करतानाच त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायन वा खतांचा वापर न करता उपलब्ध साधनासह सेंद्रिय शेती करणे हा उद्देश होता. त्यामागे प्रेरणा व अपेक्षा होती ती स्थानिक शेतकरी व भूमिहीनांना उत्पादक शेतीचा पर्याय उपलब्ध करून देणे व ग्राहकांना पौष्टिक धान्य, फळे व भाज्या उपलब्ध करून देतानाच उत्पादक शेतकरी- शेतमजुरांना वाढीव उत्पन्न कायमस्वरुपी स्वरूपात मिळवून देणे. यामुळेच “संभव’ हा उपक्रम आपला व्याप आणि प्रभाव सतत वाढवीत असल्याचे दिसून येते. या उपक्रमामध्ये सहभागी झालेले वनवासी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या सेंद्रीय शेती आणि कृषिउत्पादन आणि उत्पन्नामुळे इतर अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना “संभव’शी संबंधित शेतकऱ्यांकडून प्रेरणा मिळत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)