करा किचनचा कायापालट

घराचा आत्मा म्हणजे स्वयंपाकघर. घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये स्वयंपाकघरातही काही बदल करावे लागतात. सजावटीसाठी खूप खर्चाची तयारी नसेल तर हुशारीने काही छोट्या गोष्टीत बदल करूनही स्वयंपाकघराला आधुनिकतेचा स्पर्श देऊ शकतो.

खिडक्‍या – खिडक्‍यांचा काळजीपूर्वक आणि कल्पक वापर केल्यास स्वयंपाकघर एकदम प्रफुल्लित वाटेल. त्यासाठी फारसा खर्चही येणार नाही. यासाठी खिडक्‍यांना कापडाचे गुंडाळता येणारे पडदे नैसर्गिक रंगातील लावता येतील. त्यामुळे सूर्यप्रकाशही पुरेशा प्रमाणात आत येईल आणि पडद्यांमुळे खासगीपणाही जपता येईल. पडदे निवडताना धुता येतील अशा पद्धतीने निवडा. तसेच त्यानुसार फर्निचरची रंगसंगती योग्य ठेवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कपाटाची दारे – जुने सामान ठेवण्याची कपाटे चांगल्या अवस्थेत असल्यास ती बदलण्याची गरज नाही. पण ती नव्यासारखी दिसण्यासाठी कपाट आहे तेच ठेवून फक्त दारे बदलू शकतो.

कपाटाचे हॅंडल – स्वयंपाकघरातील कपाटांच्या मुठी किंवा हॅंडल बदलणे हा तर एक स्वस्तात मस्त पर्याय आहे. बाजारात नव्या, जुन्या स्टाईलमध्ये अनेक हॅंडल्स पाहायला मिळतात. अगदी स्टीलपासून ब्रासपर्यंत अनेक पद्धतीची हॅंडल्स मिळतात. त्याचा उपयोग करता येईल.

शेगडीच्या मागची भिंत – शेगडी किंवा गॅस स्टोव्हच्या मागे असणारी भिंत हा स्वयंपाकघरातील ओशट होणारी जागा. त्यासाठी स्टेनलेस स्टील बॅकस्प्लॅश वापरू शकतो. हे बॅकस्प्लॅश स्वयंपाकघराला आधुनिक लूक देऊ करणारे आणि उष्णतारोधकही असतात. शेगडीच्या मागच्या बाजूला मजबूत काचेचा वापरही करता येईल.

सिंक – स्वयंपाकघरातील महत्त्वाची स्वच्छतेशी निगडित असणारी, आवर्जून लक्ष जाणारी किंवा पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे भांडी धुण्याचे बेसिन किंवा सिंक. सिंकला नवे रूप देण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करता येऊ शकेल. नळांचा वापर करताना नळीसारखे लांबसर निवडावेत. त्यामुळे मोठी भांडी धुणे सोपे जाते.

– प्रियांका जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)