बुलंदशहर दंगलप्रकरणी तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

लखनौ: उत्तरप्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यामध्ये झालेल्या दंगल प्रकरणी राज्य सरकारने तीन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात जिल्ह्याचे एसएसपी कृष्ण बहादुरसिंग, सर्कल ऑफिसर सत्यप्रकाश शर्मा आणि चिंगरावती पोलिस चौकीचे प्रमुख सुरेशकुमार यांचा समावेश आहे. या दंगलीच्या प्रकरणात राज्य गुप्तचर विभागाचे अतिरीक्त महासंचालक एसबी श्रीधर यांनी चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातील निष्कर्षानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी झालेल्या दंगलीत एक पोलिस निरीक्षक आणि एक युवक असे दोन जण ठार झाले आहेत.

सुबोधकुमार सिंग असे ठार झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव असून ते दादरी हिंसाचार प्रकरणातील तपास अधिकारी होते. या दंगल प्रकरणात आत्तापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा बजरंग दलाचा मुख्य निमंत्रक योगेश राज हा या दंगलीचा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या कटात सहभागी असलेला जीतू फौजी नावाचा संशयीत जम्मुला पळून गेला असून त्याला पकडून आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक तिकडे पाठवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)