ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर सोलापुरात 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत कार्यरत असलेल्या तसेच मूळगाव सोलापूर असलेल्या ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या आहेत.

अकलुजचे पोलिस निरीक्षक संजय सुर्वे यांची सांगली येथे, माढ्याचे पोलिस निरीक्षक दिलीप लुकडे तसेच वैरागचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे या दोघांची पुणे ग्रामीण, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे,सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप या दोघांची कोल्हापूर येथे, टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. वळसंगचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी, पंढरपूर शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा,अक्कलकोट नॉर्थचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे या तिघांची सातारा येथे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव,शंकर पाटील,राजेंद्र कदम व संजय मोतेकर या चौघांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी,रविंद्र डोंगरे,ए.ए.भवड व विश्‍वास साळोखे, पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक भागवत मुंढे,साताऱ्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे हे सोलापूर ग्रामीण दलात रुजू होणार आहेत. सातारा येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन येडगे,बजरंग कापसे,पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल हे सोलापूर ग्रामीण दलात रुजू होणार आहेत. सातारा येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन खान,प्रकाश इंगळे,दिनेश कुंभार,पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे,छबु बेरड हे सोलापूर ग्रामीण दलात रुजू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)