चॉईस पोस्टिंग देणाऱ्या ‘त्या’ लिपिकाची बदली

पिंपरी : पिंपरी- चिंचवड आयुक्‍तालयात चॉईस पोस्टिंगच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या लिपिकाची बदली करून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. संबंधित लिपिक बदल्यांसाठी पैसे घेत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तडकाफडकी करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

आयुक्‍तांनी कारवाई केलेल्या लिपिकाचे नाव भुट्टे असे आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. काही अपवाद वगळता शहरातील सर्वच पोलीस ठाण्याचे कारभारी बदलण्यात आले. तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार पोलीस ठाणे देण्यात आले.

मात्र, या बदल्या होत असताना आयुक्तलयातील एका लिपिकाने बदल्यांसाठी पोलिसांकडून पैसे घेतल्याची कुजबूज आयुक्त पद्मनाभन यांच्या कानावर आली. याबाबत खातरजमा केल्यानंतर संबंधितावर कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. संबंधित लिपिकाने बदलीसाठी पैसे घेतले असल्यास तात्काळ आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले

“भुट्टेंबाबत तक्रारी लक्षात आल्यानंतर आम्ही चौकशी केली. चौकशीमध्ये सारा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार भुट्टेवर कारवाई करण्यात आली असून यासबंधी त्याने आणखी कोणाला फसवले असेल तर तशी माहिती त्वरित देण्याचे आदेश सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
– आर.के.पद्मनाभन, पोलीस आयुक्त

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)