नौदल अधिकाऱ्यांना मिळणार आण्विक-जीवशास्त्रीय हल्ल्यांपासून बचावाचे प्रशिक्षण 

संग्रहित छायाचित्र

पुणे – समुद्रात तैनात असलेल्या युद्धनौकांवर अनेकदा आण्विक-जीवशास्त्रीय-रासायनिक शस्त्रास्त्रांचा मारा होतो. अशा घातक शस्त्रांस्त्रांचा नौकेवर तैनात नौदलाच्या जवानांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. हा दुष्पपरिणाम टाळण्यासाठी आवश्‍यक उपाय योजनांचे प्रात्यक्षिक आता नौदल सैनिकांना मिळणार आहे. सध्यस्थितीत या प्रशिक्षण केंद्रात देशातील तब्बल सात हजार नौदल सैनिक हे प्रशिक्षण घेत आहेत. पुण्याजवळील लोणावळा येथे असलेल्या आयएनएस शिवाजी या नौदल प्रशिक्षण केंद्रावर “न्युक्‍लिअर-बायोलॉजिकल-केमिकल ट्रेनिंग फॅसिलिटी (एनबीसीटीएफ)चे उदघाटन नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी नौदल अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

एनबीसीटीएफबाबत ऍडमिरल लांबा म्हणाले,”” भारतीय नौदलाकडून उभारण्यात आलेले हे प्रशिक्षण केंद्र हे आशिया खंडातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. आयएनएस शिवाजी येथे आतापर्यंत आगीपासून बचावकार्याचे (फायर प्रोटेक्‍शन) तसेच नुकसान प्रतिबंधक कार्याचे (डॅमेज कन्ट्रोल) प्रशिक्षण देणारी केंद्रे कार्यरत होती. यामध्ये आता आण्विक-जीवशास्त्रीय-रासायनिक शस्त्रास्त्रांच्या माऱ्यापासून बचावाचे तसेच हा मारा झाल्यानंतर आवश्‍यक उपायांचे प्रशिक्षण देणारे हे नवे केंद्र आजपासून कार्यरत होत आहे.

ही नौदलासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सागरी युद्धादरम्यान आण्विक- रासायनिक- जीवशास्त्रीय क्षेपणांस्त्रांचा मारा झाल्यास त्यापासून बचाव कसा करायचा यासंदर्भातील प्रत्यक्ष प्रशिक्षण याठिकाणी नौदा अधिकाऱ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे नौदलाच्या युदध सज्जतेत वाढ होऊन, त्याचा फायदा नौदलाला आणि पर्यायाने देशाच्या सागरी सीमेच्या रक्षणाला होईल.”

एनबीसीटीएफ’चे प्रशिक्षण आतापर्यंत केवळ सैदधांतिक म्हणजेच थेरॉटिकल स्वरूपात दिले जात होते. मात्र या प्रशिक्षण केंद्रामुळे त्याचे प्रत्यक्ष कृत्तीद्वारे प्रशिक्षण घेता येणार आहे. नौदलाच्या ताफ्यातील प्रत्येक युद्धनौकेत न्युक्‍लिअर-बायोलॉजिकल-केमिकल(एनबीसी) माऱ्यापासून शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या योग्य वापरासाठी हे प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात यासाठी युद्धनौकेची प्रतिकृतीदेखील उभारण्यात आली असून देशभरातील नौदल अधिकारी आणि जवान यांना याठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असणार आहे.

– अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज अशी भारतीय बनावटीचे प्रशिक्षण केंद्र
– आशिया खंडातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र
– हल्ल्यापासून बचावासाठी पाच स्वतंत्र कक्ष
– दोन दिवस ते सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी
– एका तुकडीत साधारण 30 प्रशिक्षणार्थी
– दरवर्षी सुमारे सात हजार अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)