कोपरगावातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ; व्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून दिली माहिती

उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी केले मार्गदर्शन

कोपरगाव: शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी कोपरगाव तालुक्‍यातील कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मार्गदर्शन केले.

मुंडके यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करताना, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्यावर प्राधान्याने काय कामकाज करावे, तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत डमी मतदान प्रात्यक्षिक दाखवणे, मतदाराने मतदान केल्यानंतर मतदाराने कोणाला मतदान केले, हे मतदारास दिसण्यासाठी मतदान प्रकियेत नव्याने दाखल झालेले व्हीव्हीपॅट मशिन मधून निघणाऱ्या स्लिपा काढून सील करणे, तीनही मशिन सिल करणे, या मध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी, तसेच मतदान प्रक्रिया दिवसभर पार पाडताना मतदान केंद्रावरील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य या बाबत मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म कसे भरावेत, या बाबत सविस्तर सूचना दिल्या.

त्यानंतर तहसीलदार चंद्रे यांनी मतदान प्रक्रियेत नव्याने दाखल झालेले व्हीव्हीपॅट मशिन हाताळणीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅटसह ईव्हीएम प्रत्यक्ष हाताळणीसाठी 15 टेबलवर उपलब्ध करुन देण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. तसेच विविध शंकांचे निरसन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)