ट्रॅक्‍टर-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

नागठाणे – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्‍यातील भरतगाव हद्दीत ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्‍टर ट्रॉली आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रॅक्‍टरचालकाने प्रसंगावधान राखत उडी टाकल्यामुळे तो बचावला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळत झाली होती.

साताऱ्याहून कराडच्या दिशेने लाकडे घेऊन निघालेली ट्रॅक्‍टर-ट्रॉली बुधवारी पहाटेच्यावेळी भरतगावच्या हद्दीत आली असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्सने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्‍टरसह ट्रॉली पलटी झाली. सुदैवाने ट्रॅक्‍टरचालकाने उडी टाकल्यामुळे तो अपघातातून बचावला आहे. मात्र, या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)