वाहतूककोंडी नित्याचीच…

आठवडेबाजारच्या दिवशी काष्टी येथे वाहनचालकांची कसरत

श्रीगोंदा – तालुक्‍यातील काष्टी येथे शनिवारी सकाळी आठवाजल्यापासून जवळपास दुपारी तीन वाजेपर्यंत “ट्रॅफिक जॅम’ होते. शनिवारी काष्टीत जनावरांचा बाजार असतो अन्‌ त्यातच नगर – दौंड रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक खोळंबली होती.

नगर-दौंड रस्त्याचे काम सुरू असल्याने काष्टीत केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे, त्यामुळे दररोजच काष्टीतून वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. त्यातच शनिवारी काष्टीत जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारसाठी शेकडो वाहने येतात. आधीच रस्त्याचे काम सुरू असताना शनिवारी बाजारमुळे वर्दळ वाढली. यामुळे शनिवारी (दि.1) सकाळी आठ वाजल्यापासून काष्टीत वाहतूक कोंडी झाली होती.

त्यातच अनेक वाहन चालकांनी बेशिस्तपणे वाहने घुसवल्याने वाहतूक कोंडी अधिक वाढली. ही वाहतूक कोंडी फोडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते यांना एका वाहन चालकाने शिवीगाळ करीत मारहाण केली. देवकाते यांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अतिरिक्‍त कर्मचारी पाठविले.

पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, आजबे, जाधव आणि टाके यांनी तेथे जाऊन वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काष्टीतील अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य केले. दुपारी तीननंतर वाहतूक काहीशी सुरळीत झाली, मात्र धिम्या गतीनेच सुरू होती. काष्टीत वाहतूक कोंडीमुळे अडकून पडावे लागल्याने प्रवाशांना मनःस्तापाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते यांना शिवीगाळ करीत दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी चंपालाल लक्ष्मण घोडके (रा.सिद्धार्थनगर, श्रीगोंदा) आणि मयूर निळकंठ गरजमल (रा. काष्टी) या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)