ट्रेड वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज 

वॉशिंग्टन: अमेरिकेचा चीन आणि युरोप यांच्याबरोबर सुरू असलेल्या व्यापारी संघर्षाचा (ट्रेड वॉर) फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. यामुळे यंदा आणि पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणार असल्याचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ने दिले आहेत.

-Ads-

अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्षामुळे यावर्षी आणि पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्था वेग 3.7 टक्के एवढा राहील. तर याआधी एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या अंदाज अहवालात अर्थव्यवस्थेचा वेग 3.9 टक्क्‌यांनी वाढेल, असे म्हटले होते. मात्र, सद्य:स्थिती पाहता अर्थव्यवस्था वेग 0.2 टक्‍क्‍यांनी घटणार असल्याचे संकेत ‘आयएमएफ’ने दिले आहेत.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेने काही चिनी वस्तूंवर दुपटीने आयात शुल्क वाढविले आहे. यामुळे चीनसह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांना त्याची झळ बसली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणार असल्याचे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचाही वेग कमी राहणार आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा वेग 1.9 टक्क्‌यांहून अधिक वाढणार नसल्याचा अंदाज बांधला आहे. फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत वाढ होणार नसून त्यात घसरण होणार असल्याचे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे.

तेल आयातीचा खर्च वाढला; विकसनशील देशांच्या चलनांचे अवमुल्यन 
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या आहे. परिणामी तेल आयात खर्च वाढला आहे. यामुळे अनेक विकसनशील देशांच्या चलनांचे अवमुल्यन झाले आहे. याचाही फटका विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे, असे ‘आयएमएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)