पर्यटकांनो तुमच्या सुरक्षेसाठी…!

पर्यटनस्थळी जनजागृती फलक ः लोणावळा पोलिसांचा उपक्रम

कार्ला – “पोलीस तुमच्या भल्यासाठी व सुरक्षे’साठी या कार्यक्रमांतर्गत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत भाजे यांच्या वतीने कार्ला भाजे परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.

कार्ला लेणी, आई एकविरादेवी मंदिर, भाजे धबधबा, भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पाटण धबधबा या भागात पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणकोणती काळजी घ्यावी, हुल्लडबाजी करु नये, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करु नये, शांततेचा भंग करु नये, दुसऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही अशी पार्किंग करु नये, संगीताचा नृत्यावर विभित्सपणे नाचू नये, “सेल्फी’च्या नादात जीव धोक्‍यात घालू नये, अशा अनेक सूचना फलकांवर आहेत.

फलकाच्या उद्‌घाटनप्रसंगी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे, सहायक निरिक्षक निरंजन रनवरे, उपनिरिक्षक माधवी देशमुख, योगेश जगताप, विशाल जांभळे, कैलास लबडे, अमित ठोसर, गणेश होळकर, दुर्गा जाधव, प्रणय उकिर्डे, सागर कुंभार, नागनाथ जगताप, आनंद शिर्के, मारुती आंबेकर आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)