पर्यटकांनाही चांदवडीचं ‘लागीर’

सातारा – सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांनी राज्यासह देश, विदेशी पर्यटकांनाही नेहमीच भुरळ घातली आहे. या पर्यटनस्थळांप्रमाणेच पर्यटकांना रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका मराठी मालिकेचे शुटिंग सुरु असलेल्या “चांदवडी’चे “लागीर’ झाले आहे.

वर्षभरापासून एका मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या मालिकेने राज्यभरातील रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. या मालिकेचे शुटिंग वाई तालुक्‍यातील एका पुनर्वसित असलेल्या चांदवडी या गावात सुरु आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मालिकेचे शुटिंग पाहण्यासाठी सुरुवातीपासूनच चांदवडी गावात हौशी रसिक भेट देत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजात सैन्य दलात असलेल्या मुलांसोबत लग्न करण्यासाठी मुलींकडून तसेच त्यांच्या पालकांकडून नकार दिला जातो. समाजाची ही भावना बदलावी हा मुख्य हेतू या मालिकेतून मांडण्यात आला आहे. समाजातील सर्वच स्तरात जवानांविषयी एक विशेष आदर, प्रेम असल्यामुळे ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेतील कलाकारांना भेटण्यासाठी रसिकवर्ग थेट चित्रीकरणाच्या ठिकाणी येऊ लागले आहेत.

सध्या दिवाळी सुट्टी असल्यामुळे शहरांमध्ये नोकरीनिमित्त असलेला वर्ग गावाकडे आला आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालविण्यासाठी हे नोकरदार कुटुंबियांना घेऊन पर्यटनस्थळांनी भेटी देत असतानाच पर्यटनस्थळांप्रमाणे या मालिकेच्या सेटला भेट देण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून पाचगणी, महाबळेश्‍वरला भेट देण्यासाठी आलेले पर्यटकही चांदवडी गावाचा शोध घेत “लागीर’च्या कलाकारांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)