खुल्या जीपमधून दौरा

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा नाराज झालेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचा एक वेगळाच अंदाज होता. ते अशा नाराज नेत्यांकडे पक्षसंघटनेची एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवत असत. 1985 च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांदरम्यान उमेदवारांच्या तिकीट वाटपावरून कॉंग्रेस नेत्यांमध्ये वादावादी झाली होती. यादरम्यान हरिद्वार येथील भल्ला कॉलेज मैदानामध्ये राजीव गांधी यांची निवडणूक सभा होणार होती.

माजी खासदार रामयश सांगतात की, जॉलीग्रंट एअरपोर्ट परिसरातच राजीव गांधींनी त्यांना बोलावले होते. राजीवजींनी तिकीट कापले गेल्यामुळे नाराज झालेल्या रामयश यांची मनधरणी केली, समजावले, तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासनही दिले. पुढे निवडणुकांनंतर विधान परिषदेवर आमदारकी देऊन त्यांना दिलेले वचन राजीव गांधींनी पूर्ण केले.
रामयश सांगतात की, हरिद्वारमधील अनेक लोक राजीव गांधी यांना थेट भेटण्यास उत्सुक होते. याबाबत रामयश यांनी एकदा राजीवजींना सांगितले. राजीव गांधी लगेचच तयार झाले. तत्काळ त्यांनी एक खुल्या जीपची मागणी केली. या जीपमधून राजीव गांधी यांनी प्रचाराचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान अनेक लोकांनी त्यांना ज्युस आणि खानपानाचे पदार्थ दिले. राजीव गांधींनीही कोणत्याही अटींविना ते स्वीकार केले आणि त्यांचा आस्वादही घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)