बर्मिंगहॅम – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ‘दक्षिणआफ्रिका-न्यूझीलंड’ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा सामना हा करो या मरो असणार आहे. जर आज आफ्रिका सामना हरली तर त्याचे सेमीफायनलमध्ये पोहचणे संपुष्टात येणार आहे. तर केन विल्यमसन याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने येथे सर्वच आघाड्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे आफ्रिकेसाठी आजचा सामना महत्वपूर्ण असणार आहे.
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर हा सामना सुरू होणार आहे. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्याने टाॅस आणि सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे. इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी 10.15 वाजता खेळपट्टीची पंच पाहणी करणार आहेत.
Unfortunately the toss will be delayed at Edgbaston.
There will be a pitch inspection at 10:15AM.#NZvSA | #CWC19 | #ProteaFire | #BackTheBlackCaps pic.twitter.com/l18bq7FifF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 19, 2019