पित्याकडूनच मुलीवर अत्याचार

वाठार स्टेशन  –कोरेगाव तालुक्‍यातील एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलगी अडीच महिने गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कोरेगावमधील एका गावात पती, पत्नी व दोन मुली असे राहत असून मोठी मुलगी (वय 15) ही दहावी तर दुसरी मुलगी सातवीमध्ये शिकत आहेत. पीडित मुलीचे वडील चालकाचे काम करत असून तो आठ दिवसांतून एकदा घरी येतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या निर्दयी पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. भीतीपोटी पीडित मुलीने ही बाब कोणास सांगितली नाही. पुन्हा दोन वेळा वडिलांनी मुलीवर अत्याचार केला.

दरम्यान, दिनांक 9 जुलै रोजी वडिलांनी मुलीस एका खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. यावेळी पीडित मुलगी ही अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. हा प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर आईने घटनेची विचारपूस केल्यावर वडिलांनी याची कबुली दिली. आईने पीडित मुलीला घेवून मुलीच्या उपचाराकरिता माहेरी धाव घेतली. मुलीच्या मामासमवेत जाऊन तिच्या आईने वाठार पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाठार पोलिसांनी संशयितास अटक करून आज न्यायालयात हजर केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)