धनाढ्य खासदारांमधील टॉप फाईव्ह

सत्यजीत दुर्वेकर

14 मध्ये आकाराला आलेली सोळावी लोकसभा ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत किंवा रईस खासदार निवडले जाण्याची साक्षीदार राहिली. या सोळाव्या लोकसभेमध्ये तब्बल 82 टक्‍के खासदार कोट्यधीश होते. यामध्ये तेलगू देसम पार्टी, टीआरएस आणि वायएसआर कॉंग्रेस या तीन पक्षांच्या खासदारांची सरासरी मालमत्ता 50 कोटींहून अधिक होती.

2014 मधील पाच सर्वांत धनाढ्य खासदारांमध्ये पहिले नाव आहे तेलगू देसम पार्टीच्या जयदेव गल्ला यांचे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या या खासदार महाशयांची अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली मालमत्ता होती 683.05 कोटी रुपये. या यादीमध्ये दुसरे नाव आहे टीआरएस पक्षाचे खासदार के. व्ही. रेड्डी. तेलंगणामधील चेवला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रेड्डी महाशयांची मालमत्ता आहे 528 कोटी रुपये. तिसऱ्या स्थानावर आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार जी. गंगा राजू. आंध्र प्रदेशातील नरसापुरम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलेल्या या खासदारांची मालमत्ता आहे 288 कोटी रुपये.

चौथ्या स्थानावर आहेत वायएसआर कॉंग्रेसच्या बी. रेणुका. आंध्र प्रदेशातील कुर्नूल लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार रेणुका यांची मालमत्ता आहे 242 कोटी रुपये. सर्वांत श्रीमंत खासदारांमध्ये मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या कमलनाथ यांचा क्रमांक पाचवा आहे. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची अधिकृत घोषित मालमत्ता 206 कोटी रुपये इतकी आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)