पुढील दहा वर्षात जगातील टॉप 10 शहरे भारतीय असतील : नरेंद्र मोदी

सूरत (गुजरात) : पुढील दहा वर्षात जगातील टॉप 10 पैकी 10 शहरे भारतीय असतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 354 कोटी रुपये गुंतवणुकीच्या एयरपोर्ट टर्मिनल भवन विस्ताराच्या कोनशिला समारंभानंतर ते नया भारत युवा सम्मेलनात बोलत होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी मिठाचा सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालय देशाला अर्पण केले. 15 एकर क्षेत्रफळात पसरलेल्या मिठाचा सत्याग्रह स्मारकासाठी 110 कोटी रुपये खर्च आलेला आहे.

पुढील दहा वर्षात जगातील टॉप 10 शहरांमध्ये दहाही भारतीय शहरांचा समावेश असेल आणि सर्वात टॉप ला सूरत असेल. सूरत केवळ भारतीयच नाही, तर जगभराचे आर्थिक केंद्र बनेल असे त्यांनी संगितले. सूरत गुजरातमधील तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ असून भविष्यात त्याची क्षमता 4 लाख 26 हजार प्रवाशांपेक्षाही अधिक होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकार संपूर्ण देश हवाई मार्गाने जोडण्याचे काम करत आहे. 17 विमानतळ अपग्रेड केले असून पुढील 4 वर्षात बंद असलेले वा ठीक नसलेले 50 विमानतळ विकसित करण्यात येणार आहेत. सन 2014 मध्ये देशात 80 पासपोर्ट केंद्रे होती. आता ही संख्या 400च्याही पुढे गेल्याचे सांगून मोबाईल ऍपमुळे पासपोर्टसाठी अर्ज करणे सोपे झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळे दूरी आणि देरी कमी झाली आहे. लोकांचे जीवन सोपे आणि सुगम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आणि त्यासाठी सीवर, पाणी, फ्लायओव्हर, शिक्षण, घरे आदी योजनांना प्राधान्य दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)