वाहतुकीच्या नियमांसाठी टॉम क्रूझची मदत

मुंबईतील ट्रॅफिकचे नियंत्रण करण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलीस सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत असतात. यासाठी बहुतेकवेळेस बॉलीवूड सेलिब्रिटीजची मदत घेतली जात असते. ट्विटरवर त्यांनी केलेल्या आवाहनाला युवा वर्ग निश्चितपणे मान देईल, असे पोलिसांना वाटत असावे. अर्थात युथ हे अशा सेलिब्रिटीजबरोबर कनेक्टेड असल्यामुळे काही अंशी त्यास यश देखील येते. आता अशा सेलिब्रिटीजबरोबर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी चक्कम हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची मदत घेतली आहे.

टॉम क्रूझचा “मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ जगभर रिलीज झाला आणि तुफान हिट चालला आहे. त्यातील स्टंट आणि अॅॅक्शनवर पब्लिक भारी खूश आहे. ओपनिंगलाच या सिनेमाने 51 मिलीयन डॉलर इतका धंदा केला आहे. या सिनेमामध्ये एक अॅॅक्शओन सिक्वेन्स आहे. त्यामध्ये टॉम क्रूझ एका बाईकवरून वेगाने जाताना दिसतो. अर्थात, त्याने हेल्मेट घातलेले नाही. याचवेळी रस्त्यावरून अतिवेगाने जाताना त्याचे संतुलन बिघडते आणि त्याची बाईक घसरते. अॅॅक्सिडेंट होतो. जीवाचा थरकाप उडवणारा हा अॅॅक्सिडेंटचा सीन आहे. याच सीनचा उपयोग मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या सुरक्षा विषयक आवाहनाच्या जाहिरातीसाठी केला आहे. हा सीन दाखवल्यावर पोलिसांनी म्हटले आहे की असा स्टंट जर तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवर कराल, तर तुम्हाला शिक्षा करणे आमच्यासाठी अजिबात इम्पॉसिबल मिशन नसेल. हे तर आमचे कामचे आहे. ही जाहिरात करण्यासाठी “सुरक्षा मुमकीन है’ अशी कॅचलाईन मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हॅशटॅगच्या स्वरूपात वापरली आहे.

-Ads-

काहीही म्हणा पण हॉलीवूडच्या सिनेमांमधील चित्तथरारक स्टंट आणि अॅॅक्शन याचे भारतीयांना जेवढे वेड आहे, तेवढे अन्य कोठेही नसेल. हॉलीवूडमधील अॅॅक्श‍न सिनेमे भारतात जेवढा धंदा करतात, तेवढा अन्य कोणत्याही देशात होत नसेल. म्युझिकल रोमॅंटिक कॉमेडी “मामा मियां’ने जगभर 230 मिलीयन डॉलर कमावले. पण भारतात तो चालला नाही. स्टिव्हन स्पिलबर्गचा “द पोस्ट’ हा पॉलिटिकल थ्रिलर, “बेन हर’ हा पिरीएड ड्रामा, “द रेवरंट’ हा ऍडव्हेंचर ड्रामा आणि म्युझिकल ड्रामा “ला ला लॅन्ड’ या सिनेमांकडेही भारतीय प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण टॉम क्रूझचा “मिशन इम्पॉसिबल द फॉलआऊट’ची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)