हिवरगाव टोलनाका झाला जाम

संगमनेर – दिवाळीच्या सुट्या संपवून चाकरमानी कामाच्या ठिकाणी परतू लागल्याने आज दुपारनंतर पुणे – नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. सुसाट जाणाऱ्या वाहनांना टोलनाक्‍यावर मात्र ब्रेक लागत होता. टोलनाक्‍याबरोबरच महामार्गावर ठिकठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसून आली. टोलनाक्‍यावरही वसुलीवर ताण पडला होता. पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा गर्दी होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सोडवताना टोल व्यवस्थापनाचीही दमछाक झाली.

दिवाळी सणासाठी कुटुंबीयांसह आठवड्यापूर्वी गावाकडे आलेले चाकरमानी दिवाळीची सुटी संपल्याने परतीच्या प्रवासाला लागले. उद्यापासून कामावर हजर होण्यासाठी ते आजच मुंबई-पुण्याकडे रवाना होत होते. दुपारपासूनच महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे महामार्गावर सहाही रस्ते “हाऊसफुल्ल’ होत्या.

विशेषतः नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहने धावत होती. नाशिक, संगमनेरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या सहाही पदरावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या. त्यामुळे महामार्ग वाहनांनी फुलून गेला होता. सुमारे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालक मिळेल. त्या जागेतून वाहने पुढे नेत असल्याने ही कोंडी अधिकच गुंतागुंतीची होत होती. त्यामुळे टोलनाका पास करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी जात होता.

टोलनाका व्यवस्थापन जादा कर्मचाऱ्यांच्या मदतीने रांगा कमी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, रस्त्यावर आलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनांच्या रांगा काही कमी होत नव्हत्या. दुचाकीस्वारांसाठी जागाच नसल्याने मिळेल त्या जागेतून दुचाकीस्वार पुढे जात होते. त्यातूनही कोंडीत भर पडत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)