मक्केतील प्रसिद्ध मशिदीवर टोळधाड – मक्केत अंदाजे 30,000 टोळ

रियाध (सौदी अरब): मक्केतील प्रसिद्ध मशिदीवर टोळधाड पडली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासंबधातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक प्रशासन टोळांचा नाश करून साफसफाई करण्याच्या प्रयत्नात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मशिदीत नमाज अदा करणारांच्या अंगावर टोळ मोठ्या संख्येने येऊन बसू लागले. अधिक प्रकाश असलेल्या आणि संगमरवरी फरशीवर टोळ मोठ्या प्रमाणात वावरताना दिसू लागले.

टोळांच्या नाशासाठी आणि सफाईसाठी 22 टीम कामाला लावल्याचे मक्का नगरपालिकेने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. त्यासाठी 138 कर्मचारी आणि 111 उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. या टोळांमुळे माणसांना कोणत्याही प्रकारचा अपाय होत नसल्याचे, त्यांच्यामुळे कोणताही आजार पसरत नसल्याचे आणि ते माणसांना चावत नसल्याचे किंग सौद विद्यापीठातील अन्न आणि कृषी विज्ञान विभागाचे प्रमुख हजल बिन मोहम्मद अल-जफर यांनी सांगितले आहे. मक्केत अंदाजे 30,000 टोळ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशा प्रकारची टोळधाड म्हणजे म्हणजे एक प्रकारचा दैवी कोप असल्याचे मीडिया यूजर्सनी म्हटले आहे. यामध्ये यहुदी, इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्माच्या लोकांचाही समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)