बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान

ढाका: बांगलादेशात संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत असून एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानासाठी संपूर्ण देशात अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौथ्यांदा पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शेख हसिना यांची यानिमित्ताने कसोटी लागणार आहे.

या निवडणुकीतील राजकीय रणधुमाळीची संधी साधून तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रकार तेथे घडत असून गेल्या काहीं दिवसांत तेथील तीन हिंदूंची घरे जाळण्याचा प्रकार घडला आहे. सुमारे सहा लाख सुरक्षा कर्मचारी जागोजागी वाहनांची तपासणी व बंदोबस्ताचे काम करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणूक प्रचाराच्या काळात सत्तारूढ अवामी लीग आणि विरोधी बांगलादेश नॅशनल पार्टीच्या समर्थकांमध्ये जोरदार चकमकी झाल्या. या हिंसक प्रकारात आतापर्यंत तेथे तेरा जण ठार झाले आहेत. सरकार सुरक्षा दलांच्या मदतीने विरोधकांच्या कार्यकर्त्यांची जबरदस्तीने धरपकड करून दहशत माजवत आहे, असा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, काल रात्री सोशल मीडियावर अफवा पसरवून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या जवानांनी आठ जणांना अटक केली आहे. या देशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्‍चन अल्पसंख्याकांची आघाडी असलेल्या युनिटी कौन्सिलच्या नेत्यांशी तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यांच्या अडचणींचे व भीतीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)