दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाइन पाहता येणार गुण
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शनिवार, दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची लेखी मार्च 2019 मध्ये घेण्यात आली होती. दहावी परीक्षेसाठी 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याचा निकाल उद्या (दि.8) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यावरून निकालाची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुडपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यासाठी त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 10 ते 19 जून, तर छायाप्रतीसाठी दि. 10 ते 29 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करण्याची मुदत आहे, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
“एसएमएस’ सेवेद्वारे निकाल पाहण्यासाठी :
bsnl मोबाइलमधून MHSSC 57766 या क्रमांकावर पाठवा.