महापालिकेची आजची सभा ठरणार वादळी

शिवसेना – अभियंता, महापौर – शिवसेना संघर्षाचे सावट

नगर – अंदापत्रक मंजुरीसाठी महापालिकेची उद्या महासभा होत आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून नगर शहरात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. शिवसेना-अभियंता, महापौर व शिवसेना यांच्यातील सुरू झालेला संषर्घाचे सावट या सभेवर असल्याने नगरकरांचे प्रश्‍नऐवजी राजकीय आखाडात सभा रंगण्याची शक्‍यता आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (मंगळवारी) दुपारी 1 वाजता अर्थसंकल्पीय सभा होत आहे. या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा करुन सूचना करण्यात येणार आहेत. मात्र, या सभेत प्रशासनाला लक्ष्य करण्याची रणनिती आहे. बोल्हेगाव रस्त्यांच्या आंदोलनावेळी बुटफेकीची घटना घडल्यानंतर शिवसेना नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर अभियंत्यांनी आयुक्‍तांना निवेदन देऊन संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून अभियंत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. तसेच सावेडी कचरा डेपोला आग लावल्याचा संशय व्यक्‍त करण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. या सर्व विषयांवर सभेत वादंग होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या 757 कोटींच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 14 कोटी 49 लाखाच्या वाढीव खर्चाची शिफारस महासभेकडे केली.

प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या निधीला कात्री लावली होती. स्थायी समितीने पदाधिकाऱ्यांच्या निधीत घसघसीत वाढ करीत पदाधिकाऱ्यांसाठी 6 कोटी 75 लाख नगरसेवक प्रभाग विकासनिधी 4 कोटी 40 लाख यासह एकूण 14 कोटी 41 लाखाच्या वाढीव खर्चाची शिफरस स्थायी समितीने महासभेकडे केली आहे. स्थायी समितीने महापौर शहर विकास निधी 5 कोटी, उपमहापौर 50 लाख, स्थायी समिती सभापती 50 लाख, महिला व बालकल्याण समिती सभापती 15 लाख, महिला व बालकल्याण उपसभापती 10 लाख, सभागृह नेता 25 लाख, विरोधी पक्षनेता 25 लाख अशी तरतूद करण्याची शिफास करण्यात आली आहे. नेहरु मार्केट, बगे पटांगण, मालमत्तांना कर आकारणी करुन वसुली वाढविणे आदी विषय चर्चिले जाण्याची शक्‍यता आहे. या सभेत शिवसेना आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)