आजची गुंतवणूक भविष्याचा वेध नक्की साधणार….(भाग-१)

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, दोन महिन्यांत होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका, कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत जाणारी किंमत, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढवण्याचे संकेत, अमेरिका – चीन यांच्यात होणारे व्यापारी युद्धाचे दूरगामी परिणाम अशा अनेक घटनांचा परिणामभारतीय शेअर बाजार व रोखे बाजारावर होत आहेत. गेले वर्षभर जणू बाजारातील तेजी संपुष्टात आली आहे, किंबहूना लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्याचे मुल्य २५ % ते ७५ % पर्यंत खाली आले आहे. साहजिकच म्युच्युअल फंडाच्या योजनेतील परतावाही नकारात्मक आला आहे.

अनेकवेळा अशा संभ्रमाच्या काळात म्युच्यूअल फंड योजनेमध्ये गुंतवणूकीसाठी योग्य काळ आहे का ? अशा वेळी एसआयपी करावी का, एक रकमी गुंतवणूक करावी ? इक्विटी का डेट योजनांची निवड करावी ? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदाराला पडत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सध्याच्या बाजाराची अवस्था अत्यंत उपयुक्त आहे. ‘मल्टीबॅगर’ (अनेक पटींनी वाढ) परतावा कमावण्याची हीच ती योग्य वेळ आहे. बाजारातील अनावश्यक गोंगाटाकडे लक्ष न देता जर गुंतवणुकदारांनी पुढील २ ते ३ महिन्यांत गुंतवणूक केल्यास, येणाऱ्या ५ ते ७ वर्षात गुंतवणुकीवर भरघोस परतावा कमावता येणार आहे.

आजची गुंतवणूक भविष्याचा वेध नक्की साधणार….(भाग-२)

मुंबई शेअर बाजाराच्या गेल्या ८ वर्षातील सर्वात खराब कामगिरीमुळे सध्या शेअर बाजार खाली आला आहे. निर्देशांकात सलग ९ सत्रांमध्ये १६२२ पुर्णांकाची घट झाली आहे. ही पडझड ४% पर्यंत नोंदविली गेली आहे. बाजार अस्थिर असताना परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक माघारी नेण्याचं सत्र कायम ठेवले आहे. हे सर्व घडत असताना भारतीय शेअर बाजाराची मजबुती तसेच जगातील सर्वात मोठी बाजारपेठ व जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही भारताची बलस्थाने आहेत. या जोरावर भविष्यात भारतीय शेअर बाजार वेगाने प्रगती करणार आहे, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)