आजची गुंतवणूक भविष्याचा वेध नक्की साधणार….(भाग-२)

आजची गुंतवणूक भविष्याचा वेध नक्की साधणार….(भाग-१)

प्रत्येक गुंतवणूकदाराने सध्या बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे,’ मोठ्या गुंतवणूकीसाठी’ ही संधी निश्चित वापरली पाहिजे. गेल्या काही वर्षांत बचत आणि गुंतवणूकीचे नियोजन करण्याकडे कल वाढला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड सातत्याने चांगला परतावा देत आले आहेत. गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून (घर, जमिन, सोनं, ठेवी इ.) आता गुंतवणूकीच्या आधुनिक प्रकाराकडे म्हणजेच म्युच्युअल फंडाकडे वेगाने वळत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक गुंतवणूकदाराने आपली उद्दिष्टे निश्चित करावी, शक्यतो गुंतवणूक दिर्घकालीन करावी (५ वर्षांपेक्षा जास्त काळ). एक रकमी गुंतवणूक शक्य नसल्यास एसआयपीच्या मार्गाचा वापर निश्चित करावा व मासिक शिस्तबध्द गुंतवणूक करावी. आपल्या उद्दिष्टाप्रमाणे व जोखिम घेण्याच्या ताकदी प्रमाणे गुंतवणूक प्रकारांची योग्य नियोजन करावे. कष्टाने कमावलेल्या पैशाचे महत्त्व समजावून घेऊन अविचारी गुंतवणूक टाळावी.

ज्या प्रमाणे सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा आवश्यक असतो तसेचआपल्या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंडाची चांगली योजना असणे गरजेचे आहे, अशीच एक उत्तम योजना बाजारात दाखल झाली आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ ते ८ मार्च २०१९ या काळात रु.१०.०० या दर्शनी मुल्यामध्ये उपलब्ध आहे. महिंद्र प्रगती ब्लूचीप योजना सुरु झाली आहे. या योजनेमध्ये निर्देशांकातील पहिल्या १०० दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.

आर्थिक प्रगतीमध्ये सातत्याने सहभागी होणा-या या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख कंपन्या व प्रगतशिल क्षेत्रांची निवड केली जाणार आहे. वाजवी मूल्यात उपलब्ध व अल्प चढ उतार असणाऱ्या कंपन्या निवडल्या जाणार आहेत. दीर्घकालीन स्थिर वाढ देण्याची क्षमता या योजनेमध्ये आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील होणारी वाढ व याचा जास्तीत जास्त फायदा या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणार आहे. एकूण भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवली करणात व जीडीपीमध्ये लार्ज कॅप कंपन्यांचा फार मोठा सहभाग सातत्याने वाढत गेलेला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतील लार्ज कॅप कंपन्यांचा वाटा.

२००८ ——- ३५%
२००९ ——- ६३%
२०१० ——– ६१%
२०११ ——– ३७%
२०१२ ——– ४७%
२०१३ ——– ४५%
२०१४ ——– ५३%
२०१५ ——– ४९%
२०१६ ——– ४६%
२०१७ ——– ५९%
( स्तोत्र : ब्लूमबर्ग )

सुरवातीपासून लार्ज कॅप कंपन्या अर्धाहून अधिक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करत आल्या आहेत. त्यामुळे या योजनेतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)