मोदींच्या आजच्या भाषणातील १० ठळक मुद्दे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये बोलताना शेतकरी, बेरोजगारी, भ्रष्टाचार इत्यादी मुद्यांवर प्रकाश टाकला. आपल्या भासनामधून त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवरदेखील जोरदार हल्ला चढवला. पाहुयात काय म्हणाले मोदी आपल्या आजच्या भाषणामध्ये…

१) देशाच्या इतिहासातील एकमेव सरकार ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२) केंद्रातील भाजपसरकारने आपल्या कार्यकाळामध्ये हे सिद्ध करून दाखविले की, भारताची प्रगती होऊ शकते आणि या देशामध्ये स्वच्छ कारभार करणारे सरकार शासन करू शकते.

३) खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेले १०% आरक्षणामुळे गरीब तरुणांना शिक्षण आणि हाताला रोजगार मिळेल. शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळालेला युवक ‘न्यू इंडिया’चा आत्मविश्वास द्विगुणित करेल.

४) यापूर्वीच्या सरकारांनी अन्नदात्याकडे (शेतकऱ्याकडे) केवळ मतदाता म्हणून पहिले मात्र भाजप सरकार अन्नदात्याच्या अडचणी कशा सोडवता येतील याकडे लक्ष देत आहे.

५) भाजप सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

६) चौकीदार आपलं काम कधीच थांबवणार नाही. चौकीदाराला जिथे चोर कुठे सापडेल तिथून तो चोराला पकडून आणेल. (ऑगस्तावेस्टलँडवरून काँग्रेसला टोला)

७) अयोध्या प्रकरणी काँग्रेसला तोडगा नको आहे. काँग्रेस आपल्या वकीलांमार्फत आयोध्याप्रकरणाच्या सुनावणीमध्ये व्यत्यय निर्माण करत आहे.

८) आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये सीबीआयवर बंदी का घालण्यात आली आहे?

९) मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेस सरकारने खूप त्रास दिला मात्र आम्ही गुजरातमध्ये सीबीआयला कधीच बंधनं घातली नाहीत.

१०) देशाला विदेशात सुट्ट्यांवर जाणारा पंतप्रधान हवा आहे का जनतेसाठी २४ तास कामकारणारा प्रधान सेवक हवा आहे… हे जनतेनेच ठरवावे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)